प्रियांक डॉट कॉम चे मराठी संकेतस्थळ">प्रियांक डॉट कॉम चे मराठी संकेतस्थळ
नमस्कार !
आपली भाषा आपल्याला नेहमीच प्रिय असते. म्हणूनच वेबसाईट मराठी भाषेत लिहावी असं नेहमी वाटायचं. जुलै २००२ सालापासून या संकेतस्थळावर मी मराठीत माहीती लिहू लागलो. ‘यूनिकोड’ मुळे हे सहज झालं आहे.
युनिकोड
‘यूनिकोड’ (Unicode) चा वापर वाढल्याने आता ‘इंडिक्’ (Indic), – ज्या मध्ये देवनागरी (संस्कृत, हिंदी, मराठी, कोंकणी, कश्मीरी, सिंधी) तसेच इतर भारतीय भाषा – सहजपणे संगणकावर लिहीता-वाचता येतात. आता इंटरनेटच्या माध्यामाने आपल्या भाषेत लाखो भारतीयांपर्यंत आपण आपले विचार, संदेश इत्यादी पोहोचवू शकतो. यूनिकोडच्या अधिकाधीक वापरामुळे ‘इंटरनेट क्रांती’ होणार आहे, किंबहुना क्रांती सुरु झाली आहेच्.
यूनिकोड प्रत्येक अक्षराला एक विशिष्ठ संख्या प्रदान करतं. यामुळे, यूनिकोड हे ‘युनिव्हर्सल स्टँडर्ड’ असून ‘प्लॅट्फॉर्म-इंडिपेंडंट’ (Platform independent) आहे. म्हणजेच् कुठल्यही संगणकावर, प्रोग्राम किंवा भाषेत चालेल असं तंत्रज्ञान. आधुनिक मानदंडांमध्ये वापरल्याने एक असं सॉफ्ट्वेअर (किंवा वेबसाईट) बनवता येते जे वेगवेगळ्या प्लॅट्फॉर्मस् वर, भाषांमध्ये उपयोगी ठरेल. यामुळे, परंपरागत तंत्रज्ञान पद्धतीपेक्षा अत्यंत अल्प खर्चात, व त्याच् बरोबर उच्च दर्जाचे काम साध्य होते.

Follow on Twitter
E-mail updates