नवरा माझा तुझी बायको

नोव्हेंबर २००६. नुक्ताच् प्रकाशीत झालेला केदार शिंदे दिग्दर्शीत “नवरा माझा तुझी बायको” चित्रपटाला शासनाने टॅक्स्-फ्री दर्जा दिला होता. शेजारीच् उघडलेल्या नव्या चित्रपट ग्रृहात याचे दिवसाला दोन खेळ चालत होते. आजकालच्या मल्टीप्लेक्स स्टॅंडर्ड प्रमाणे २ खेळ म्हणजे पिक्चर नक्कीच् चालत असणार, असं मला वाटलं. साधारणपणे टॅक्स्-फ्री चित्रपट चांगले असतात असं कुठेतरी वाचलं होतं. मला नेमकं काय झालं कोणास ठाउक, पण मी सहज गेलो आणि चक्क २ तिकीटं काढली!

आता प्रश्न होता तो एक बकरा शोधण्याचा. एकट्याने पिक्चर बघणं मला विचित्र वाटतं, म्हणुन मी नेहमीच्या गिर्हाईकांना फोन करू लागलो. अगदी वाईट परीस्थीतीत मी त्याचं तिकीट स्पॉन्सर करण्याची सोय केली होती. एक तासात एक मित्र हा (फालतू) चित्रपट बघण्यास तैयार झाला. या वरून तुम्हाला कळलं असेल की मी किती चांगला सेल्समन आहे!

पिक्चर चालू होउन अर्धा तास झाला तरी मला आशा होती की पुढे काहेतरी चांगलं असेल. माझा मित्र शेजारी बसून माझ्यावर शाब्दिक मारा करत होता. मी त्याला समजावत होतो की ही नोर्मल मार्केटींग स्ट्रॅटजी आहे. मी कधीच् पिक्चर अर्धवट सोडून गेलो नव्हतो, पण आज रेकॉर्ड ब्रेक करायची ईच्छा होत होती. नावावरूनच् कळायला हवं होतं. टप्याटप्यावर टुकार संभाण, बुड नसलेली कथा, पाचकळ विनोद व एकंदरीत तिसर्या प्रतीचा चित्रपट. पैसे घेउनही कुणी हा चित्रपट बघु नये ही विनंती.

मराठी चित्रपटांची दयनीय आवस्था बघून मला फार वाईट वाटलं. खालच्या दराचे चित्रपट बनविण्यापेक्षा काही न बनवलेलं बरं, असं मला वाटतं…

2 thoughts on “नवरा माझा तुझी बायको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>