Mar '07
10
“शिवसेना-भाजप-कॉंग्रेस युतीला मतदान करा” - ठाकरे
सकाळ: सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही. शिवसेना-भाजप युतीशी कॉंग्रेसने अंबरनाथच्या विकासासाठी हातमिळवणी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची मस्ती उतरविण्यासाठी शिवसेना-भाजप-कॉंग्रेस युतीला मतदान करा, असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागांसाठी शिवसेना-भाजप-कॉंग्रेस युतीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी वांगणी रेल्वेस्थानकाशेजारीच झालेल्या प्रचारसभेत ठाकरे साहेबांनी असे विचार मांडले.
राजकिय पक्ष खरंच् विचार भिन्नतेतून जन्माला आले आहेत का? ‘सत्ता’ हा जरी एकच् विचार असला तरी हे मात्र फारच् झालं…. !!
Related posts
Please comment