सकाळ पेपरात बातमीची पहिली ओळ वाचली आणि पूर्णपणे गंडलो. भारताबाहेर जाऊन २ महिने पण झाले नही आणि देशात एवढे बदल?? डॉल्फिनच्या दरात कपात म्हणजे नेमकं काय झालं असावं याचा विचार करत होतो. पुढे वाचलं तेव्हा समजलं की ही बातमी डॉल्फिन माश्याबद्दल नव्हे, तर MTNL डॉल्फिन मोबाईलसेवेच्या ग्राहकांसाठी आहे. हुश्श..
मोबाईल सेवा आणि सिग्नलचं जाळं आपल्या कडे अतिशय प्रगत आहे. हच, एअरटेल, डॉल्फिन ईत्यादी कंपन्यांमध्ये अटितटीची स्पर्धा असल्याने अधिकाधीक ग्राहक मिळवण्यामागे त्यांचे लक्ष असतं. म्हणूनच् मोबाईलचे दर इतके स्वस्तं असावेत व मोबाईल असणं सर्वसाघारण गोष्टं असावी. ईथे मात्र परीस्थिती वेगळी आहे. खूप कमी लोकांना मोबाईल परवडतो. कोणासठाऊक का, पण ईथल्या मोबाईल कंपन्या पण मंद वाटतात. असो.
ईथे बहुतेक सेलफोन (यंत्र) हे कॉन्ट्रॅक्ट वर मिळतात. यंत्राची किंमत अतिशय कमी, किंवा शून्य असते. पण मासिक प्लॅन ठरलेला असतो. नियोजीत भाडं भरायचं की झालं. रात्रीच्या वेळी व शनिवार, रविवार विनामूल्य कॉल करू शकतो. अर्थात त्यांच्या बर्याच् योजना असतात. तरी, मुंबईत जी सेवा मिळते तशी ईथे मिळतच् नाही.
या बाबतीत आपण नक्किच प्रगत आहोत

Follow on Twitter
E-mail updates
वा.. छान !
↵Viraj
↵thanks man