आज सकाळी १०:३० वा. डोंबिवली रेलवे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी केलेल्या जन-आंदोलनामुळे ठाणे ते कल्याण दरम्यान उपनगरीय वहातुक पूर्णपणे बंद होती. हे ‘रेल-रोको’ सुमारे ९ तास सुरू होते, व सायंकाळी कार्यालयातून परतणार्या लोकांना प्रचंड गर्दी व विस्कळीत वहातुकीला सामोरे जावे लागले.
मी सकाळी कल्याण ला income tax returns भरायला गेलो होतो. कल्याण हून थेट आॅफिस ला जाण्याचा बेत होता. धावत धावत प्लॅटफाॅर्म नं ६ च्या जलद गाडीत घुसलो, आणि गाडी सुरू होताच् मी किती lucky आहे असं वाटलं. पण पत्री पुलापर्यंत जाऊन गाडी थांबली व पुढची १५ मि. कणभरही सरकली नाही. लोकांनी बाहेर उड्या मारायला सुरू केल्या, व मी पण कल्याण स्थानकापर्यंत चालत आलो. एका मागे एक लोकल गाड्यांची रांग लागली होती.
स्टेशन बाहेर रिक्षा चालकांचा धंदा जोरात चालू होता. मी डोंबिवली च्या बस स्टाॅप वर गेलो, पण गर्दी इतकी की बस दिसेना ! शेवटी ३ अन्य लोकांबरोबर रिक्षाने जायचं ठरवलं. तो २०-२५ रू. मागत होता, पण ‘ आम्ही फक्त १० रू. देऊ ‘ असं म्हणून सरळ आत शीरलो. मग आरामात डोंबिवली ला पोहोचलो.
डोंबिवली स्थानकात लोकांची अतोनात गर्दी. बर्याच् गाड्या एका मागे एक उभ्या होत्या, व आंदोलक रुळांवर बसले होते. द्रुश्य बघण्यासारखे होते.
सारांश: पाच-पंधरा लोकांमुळे हजारो प्रवाशांचे हाल. (व माझी एक सुट्टी गेली).

Follow on Twitter
E-mail updates
I caught the 0930 slow train, and reached office at 1100 hrs. Lucky no. By the time, I left office it was already 2130, so I went home comfortably
↵Hello Priyank,
I was looking for Marathi blogs online and found yours. I have recently started one blog dedicated to Marathi Literature at http://marathisahitya.blogspot.com/. Do visit it if you find it interesting.
↵